आजपासून राज्यात दहावीच्या बोर्डाची परीक्षा

Update: 2022-03-15 02:51 GMT

कोरानानंतर विस्कटलेली शिक्षण व्यवस्था पुन्हा एकदा पूर्वपदावर येत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. राज्यातील एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी परीक्षेला बसले असून मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21 हजार 384 ठिकाणी परीक्षा पार पडणार आहे.

कोरोनाच्या संकट काळात मागच्या दोन वर्षात मुलांच्या ऑनलाईन परीक्षा झाल्या आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा परीक्षा ऑफलाईन (offline exam) घेण्याचं ठरवलं आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या परीक्षा केंद्रावर एक तासापुर्वीच पोहचणं गरजेचं आहे. परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्राच्या आतमध्ये प्रवेश मिळेल.

विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेच्या आगोदर किमान 1 तास आगोदर जावं लागेल.विद्यार्थ्यांना फेस मास्कसोबत ठेवणे अनिवार्य आहे, त्याचसोबत त्यांच्याकडे सॅनिटायझर ठेवणे गरजेचं आहे.

परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरती विद्यार्थ्यांची तापमान तपासणी केली जाईल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवता येणार नाही.

विद्यार्थ्यांच्या हातात पेपर आल्यानंतर त्यांनी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका नीट वाचून घ्यावी

परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचे राज्य मंडळाचे नियोजन

महाराष्ट्रात मागच्या दोन वर्षात कोरोना संसर्ग अधिक असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला. तसेच सध्या कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात कमी प्रमाणात असल्याने परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.




 


16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. 21 हजार 384 केंद्रावरती परीक्षा होतील. एखादा विद्यार्थी कोरोना बाधित झाला असेल किंवा अन्य वैद्यकीय कारणामुळे प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी परीक्षा न दिलेला विद्यार्थ्यांची 5 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे. इतर पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचे राज्य मंडळाचे नियोजन आहे.

विद्यार्थ्यांला खोकला किंवा सर्दी असल्यास वेगळ्या वर्गात ठेवणार

परीक्षा केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता केंद्राकडून आवश्यक ती काळजी घेण्यात येणार आहे. परीक्षेनंतर नियमित वर्ग सुरू राहणार असल्याने परीक्षा संपल्यानंतर त्या केंद्रावर साफसफाई आणि र्निजतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थ्यांला खोकला किंवा सर्दी असल्यास त्याला वेगळ्या कक्षात ठेवण्यात येणार आहे.

Tags:    

Similar News