२० फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन

Update: 2024-02-15 05:09 GMT

Mumbai - मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर अखेर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून, २० फेब्रुवारीला हे अधिवेशन होणार आहे. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विशेष अधिवेशनात सगेसोयरे यासंदर्भातील अधिसूचनेचा कायदा पारित होण्याची शक्यता आहे.

मराठा-कुणबी आरक्षणात सगेसायऱ्यांच्या व्याख्येसंदर्भातील मसुद्याच्या अंमलबजावणीबाबत कित्तेक दिवस संभ्रम होता यामुळे मनोज जरांगे-पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे राज्य सरकारविरोधात मराठा आंदोलकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारकडून २० फेब्रुवारीला विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. 

Tags:    

Similar News