मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तांचा हटके अंदाज, म्हणाले ''इथे सिंघम नाहीच...''
आयपीएस अधिकारी देवेन भरती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच विशेष पोलीस आयुक्त पद निर्माण करण्यात आली आहे. आता हे पद निर्माण करून देवें भरती यांची या पदावर नियुक्ती केल्यानंतर यावर अनेकांकडून टीका केली जात आहे तर अनेक जण याचे समर्थन करत आहेत.देवेन भारती यांना मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. भारती हे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील आहेत अशी सर्वत्र चर्चा आहे. पण त्यांची नियुक्ती होण्यामागे केवळ तेच एकमेव कारण आहे का? आपल्या अधिकाऱ्यांना फडणवीस जपतात, असे जे म्हटले जाते तेव्हढ्यापुरतेच भारती यांचे महत्त्व आहे का? असे प्रश्न साहजिकच त्यामुळे उपस्थित होत आहेत.
आता एकीकडे ही चर्चा असताना या पदावर नवनियुक्त झालेल्या देवेन भरती यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, ''Mumbai Police is a Team. Singhams don't exist.'' म्हणजे मुंबई पोलीस एक टीम आहे, इथे कोणीच सिंघम अस्तित्वात नाही..
Mumbai Police is a Team. Singhams don't exist. @MumbaiPolice
— Deven Bharti 🇮🇳 (@DevenBhartiIPS) January 5, 2023
मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भरती कोण आहेत?
आपली अधिकाधिक कारकिर्द गुप्तचर विभागात काम केले आहे. भारती हे जेव्हा मुंबईत नियुक्त झाले तेव्हा ते विशेष शाखेच्या पारपत्र विभागाचे उपायुक्त होते. मुंबईतील संघटित गुन्हेगारीबाबत ते अत्यंत सतर्क होते. त्यामुळेच पारपत्र विभागातून त्यांची नियुक्ती गुन्हे अन्वेषण विभागात झाली. या काळात त्यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणे, इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवादी कारवाया, २६ नोव्हेंबरचा हल्ला, जे डे हत्याप्रकरण अशी कितीतरी प्रकरणे त्यांनी धसास लावली. राकेश मारिया, हिमांशू रॅाय यांच्यासारखे सहआयुक्त लाभल्यामुळे भारती यांना मुक्तहस्त मिळाला व त्यांनी आपल्या कार्यपद्धतीची छाप पाडली. आता आयपीएस अधिकारी देवेन भरती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..