योगी आदित्यनाथ यांच्याविरोधी वक्तव्य, आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान(SP leader Azam khan) यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी न्यायालयाने आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.;
आझम खान(Azam khan) यांनी तीन वर्षांपुर्वी रामपूर (Rampur milak assembly electoral area) येथे बोलताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी न्यायालयाने आझम खान यांना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याबरोबरच न्यायालयाने आझम खान यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
2019 लोकसभा निवडणूकीच्या काळात रामपूरच्या मिलक विधानसभा क्षेत्रात एक भाषण केले होते. या भाषणादरम्यान त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोप प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत न्यायालयात खटला उभा राहिला. दरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद केले. त्यानंतर अखेर न्यायालयाने आझम खान यांना दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. (the court sentenced three year to azam khan)
आमदारकीवर सोडावे लागणार पाणी
आझम खान यांनी तीन वर्षापुर्वी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आझम खान यांना आमदारकीवर पाणी सोडावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे पर्याय आझम खान यांच्यापुढे असणार आहेत.
काय आहे प्रकरण ? (What is case)
आझम खान यांना शिक्षा सुनावण्यात आलेले प्रकरण 2019 मधील आहे. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि तात्कालिन उपमुख्यमंत्री यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी 27 जुलै 2019 रोजी आकाश सक्सेना या भाजप कार्यकर्त्याने आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावरून न्यायालयाने आझम खान यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.