ED चौकशीचे वादळ घोंगावत असताना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी देखील परदेशात असल्याने ED चौकशी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोनिया गांधीं सोबत तबैठकीत सहभागी झालेल्या अन्य काही नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस (Congress) नेत्यांसोबत बैठका सुरू होत्या. या बैठकीदरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहेत. काँग्रेस प्रवक्तेत रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.
सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येताच बैठकीला हजर असलेल्या कॉंग्रेस नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे. सोनिया यांच्या संपर्कात आलेल्या इतरही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केला जात आहे.
बुधवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांना ताप आला होता. तापाची हलकी लक्षणं समोर आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याच स्पष्ट झालं आहे.
८ जून ला इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी होणार होत्या हजर त्या अगोदर सोनिया गांधी यांना कोरोना झाल्याने ८ जून ची नॅशनल हॅरोल्ड प्रकरणातील चौकशी पुढं ढकलण्याची शक्यता राहुल गांधी सध्या परदेशात असल्याने ते देखील चौकशीला हजर राहणार नाहीत. १ जून ला नॅशनल हॅरोल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना इडीची नोटीस आली होती.