सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांची प्रकृती चिंताजनक..
सामाजिक कार्यकर्ते प्रा. शेखर सोनाळकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. जळगाव येथील गाजरे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शेखर सोनाळकर ह्यांचा समाजवादी तसेच पुरोगामी चळवळ खान्देशांत रुजवण्यासाठी मोठा वाटा आहे.
आणीबाणी ला विरोध केल्याने सोनाळकर ह्यांना कारागृहात ही जावं लागलं होत,
डॉ श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या बरोबर
'सामाजिक कृतज्ञ निधी' संस्थेचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पहिले आहे.
'छात्र युवा वाहिनी' संघटनेचे अनेक वर्ष सदस्य म्हणूंन अनेक वर्ष काम केलं आहे.
'राष्ट्रीय सेवा दला'चे कार्यकर्ते म्हणून काम केलं आहे.
सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांचे गाढे अभ्यासक आहेत 'एक गाव एक पाणवठा' ह्या चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. जनता दल पक्षाकडून निवडणूकही लढवली आहे.आम आदमी पार्टी या पक्षासाठी त्यांनी काम केलं आहे. शेखर सोनाळकर लवकर बरे व्हावे यासाठी त्यांच्या अनुयायांनी प्रार्थना केली आहे.