पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना संयुक्त राष्ट्र महासभेत सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या स्नेहा दुबे सध्या देशभरात चर्चेत आहेत. मात्र, या स्नेहा दुबे यांचं आता पुणे कनेक्शन समोर आलं आहे. काय आहे पुणे कनेक्शन? स्नेहा दुबे नक्की कोण आहेत? हे तुम्हाला माहिती आहे का? स्नेहा दुबे (Sneha Dubey) या संयुक्त राष्ट्र महासभेत भारताच्या प्रथम सरचिटणीस आहेत.
स्नेहा दुबे ह्या २०१२ च्या IFS बॅचच्या अधिकारी आहेत. त्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास झाल्या. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांना IFS ऑफिसर होण्याची इच्छा होती. जागतिक पातळीवरील घडामोडी आणि जग फिरण्याची त्यांना लहानपणापासून आवड होती.
त्यांनी पदव्युत्तर पदवी भूगोलात मिळवली असून त्याच विषयात त्यांनी M.Phil केले आहे. त्यांनी ही पदवी जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून JNU मिळवली आहे. तर शालेय शिक्षण गोव्यात आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले आहे.
त्यांचे वडील एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला आहेत आणि आई शिक्षिका आहे. माद्रिदमधील भारतीय दुतावासाच्या तृतीय सचिव म्हणून त्यांनी याआधी काम केले आहे. तर परराष्ट्र मंत्रालयातही त्यांनी काम केले आहे.