पाकला फटकारणाऱ्या स्नेहा दुबेंनी अंजना ओम कश्यपला दाखवला बाहेरचा रस्ता

Update: 2021-09-25 14:22 GMT

aaj tak

एरवी आपल्या स्टुडिओमधून पाहुण्यांना परखड सवाल विचारणाऱ्या आज तकच्या न्यूज अँकर अंजना ओम कश्यप अमेरिकेत मात्र धक्का बसला आहे. पाकिस्तानला फटकारणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या अधिकारी स्नेहा दुबे यांनी अंजना ओम कश्यप यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

नेमके घडले काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा कव्हर करण्यासाठी अंजना ओम कश्यप सध्या अमेरिकेत आहेत. या दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेत भारताच्या अधिकारी स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या भाषणाची चिरफाड करत पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे मांडला. त्यानंतर स्नेहा दुबे यांच्या भाषणाची जगभरात चर्चा झाली. याची दखल भारतातील माध्यमांनीही घेतली आणि दिवसभर स्नेहा दुबे देशातील मीडियाच्या हेडलाईन्समध्ये होत्या. या दरम्यान अंजना ओम कश्यप यांनी संध्याकाळच्या बुलेटिनमध्ये लाईव्ह करत थेट स्नेहा दुबे यांच्या रुमध्ये प्रवेश केला आणि त्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. पण स्नेहा दुबे यांनी आपल्याला जे काही बोलायचे होते ते आपण योग्य ठिकाणी मांडले आहे, असे सांगत बोलण्यास नकार दिला. एवढेच नाही तर त्यांनी अंजना ओम कश्यप यांना बाहेर जाण्याचाही इशारा केला.

या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ आता ट्विटरवर व्हायरल झाला आहे. रोशन राय या नावाच्या ट्विटर हँडलवरुन बुलेटिनमधला तेवढा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर अंजना ओम कश्यपने आता TRP साठी स्नेहा दुबेचा वापर करण्याचा प्रयत्न करत तिच्या रुममध्ये घुसखोरी केली, पण स्नेहा दुबेने तिला बाहेरचा रस्ता दाखवला, अशी टीकाही करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News