शेतकरी आंदोलक सीताबाई तडवीला सरकार न्याय देणार का?

महाविकास आघाडी सरकार आंदोलक महिला शेतकरी सीताबाई तडवीला मदत कधी करणार? प्रतिभा शिंदे;

Update: 2021-12-05 04:50 GMT

आज दिल्लीच्या सिंघू बाॅर्डरवर संयुक्त किसान मोर्चा ची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून लोक जनसंघर्ष समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे याही सहभागी झाल्या होत्या. या बैठकीत झालेल्या निर्णया संदर्भात आम्ही त्यांच्याशी बातचीत केली.

यावेळी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र सरकारने सिताबाई तडवी च्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिंदे यांनी यावेळी केली आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने केंद्रामध्ये येऊन राज्यसभेत आणि लोकसभेत फक्त बोलू नये की, शेतकऱ्यांना भरपाई द्या किंवा गुन्हे मागे घ्या तर त्यांनी स्वतः देखील याबद्दल महाराष्ट्रामध्ये कृती केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्रातील आंदोलक शेतकर्यांवर जे गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे घेण्याची मागणी यावेळी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील आंबाबारी येथील रहिवासी सिताबाई तडवी (वय 56) याचं शेतकरी आंदोलनातून परतत असताना निधन झालं होतं. त्या१६ जानेवारीपासून दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 26 जानेवारीला दिल्ली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्या नंदुरबारकडे परतत असताना जयपूर स्टेशनवर अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि सकाळी ५च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्या सीताबाई तडवीच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी प्रतिभा शिंदे यांनी सरकारकडे केली आहे.

Tags:    

Similar News