वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी 6 भाविकांचा मृत्यू, 20 हून जण जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये नववर्षादरम्यान वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, 20 हून अधिक भाविक गंभीर जखमी झालेत. जखमींना तातडीने उपचाररुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.;

Update: 2022-01-01 01:53 GMT

श्रीनगर // जम्मू-काश्मीरमध्ये नववर्षादरम्यान वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, 20 हून अधिक भाविक गंभीर जखमी झालेत. जखमींना तातडीने उपचाररुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत सुमारे 20 जणांना रेस्क्यू केलं आहे. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

रियासी येथील नियंत्रण कक्षाने सांगितले की कटरा येथील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे प्रशासन आणि व्यवस्थापनाने पुढील आदेशापर्यंत यात्रा स्थगित केली आहे.तर कटरा येथील रुग्णालयातील बीएमओ डॉक्टर गोपाल दत्त यांनी सांगितले की, आम्हाला सध्या 6 जणांचे मृतदेह मिळालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमच्याकडे अद्याप पूर्ण तपशील नाहीत.

Tags:    

Similar News