महिला परिचर महासंघाचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

बुलडाणा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन महिला परिचरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.;

Update: 2021-07-28 01:51 GMT

बुलडाणा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन महिला परिचर यांना सेवेत कायम करावे, किमान वेतन 18 हजार रुपये देण्यात यावे या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने बुलडाणा जिल्हा परिषदे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

मागील अनेक वर्षांपासून महिला परिचर सेवेत कायम करण्याची मागणी करत आहेत, सोबतच शासनाकडून अतिशय तुटपुंज मानधन मिळत असल्याने किमान महिला परिचराना वेतन वाढ करावी अशी मागणी करत आहेत. या आणि अशा इतर मागण्यांसाठी अनेकदा निवेदनं दिली, आंदोलन केले तरी या मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून संतप्त होत या महिलांनी थेट जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.यावेळी महिला परीचरांनी शासन- प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहिल असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणलेत.

Tags:    

Similar News