सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसानिमित्त बहिणीची भावनिक पोस्ट
सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीने एक व्हिडिओ शेअर केला लिहिले- हॅप्पी बर्थडे मेरा सोना भाई . सुशांतचे चाहतेही या पोस्टवर कमेंट करत आहेत.;
सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीने एक व्हिडिओ शेअर केला लिहिले- हॅप्पी बर्थडे मेरा सोना भाई . सुशांतचे चाहतेही या पोस्टवर कमेंट करत आहेत.
सुशांतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला होता. तो त्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आला. सुशांत हा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार होता. पवित्र रिश्ता या शोमधून त्याला प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये तो अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या विरुद्ध भूमिका साकारत होता. सुशांतने चित्रपटांमध्येही काम केले. काई पो चे या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शुद्ध देसी रोमान्स, पीके, एमएस धोनी, राबता, वेलकम टू न्यूयॉर्क, केदारनाथ, सोनचिरिया, छिछोरे, ड्राईव्ह आणि दिल बेचारा या चित्रपटांमध्ये तो दिसला होता. दिल बेचारा हा चित्रपट सुशांतच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले
माझ्या मार्गदर्शक ताऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बॉलीवूडस्टार अभिनेता सुशांत शिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण श्वेताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुशांतचे आनंदाचे क्षण आहेत. श्वेताने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले - माझ्या सोन्यासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,आणि खूप खूप प्रेम मला आशा आहे की तु लाखो हृदयात राहशील आणि त्यांना चांगले होण्यासाठी प्रेरित करशील. तुमचा वारसा तुम्ही प्रेरित केलेल्या लाखो लोकांसाठी आहे. , प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की पुढे जाण्याचा एकमेव मार्ग देव आहे. तुमचा अभिमान वाटतो. माझ्या मार्गदर्शक ताऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू नेहमी चमकत रहा आणि आम्हाला मार्ग दाखवत राहा. तिने पुढे लिहिले - मी प्रेम आणि शुभेच्छा पाठवत आहे जेणेकरून तुला स्वर्गातही आमचे प्रेम अनुभवता येईल.
सुशांतचे चाहतेही त्याची आठवण काढत आहेत. सुशांतचे चाहते श्वेताच्या पोस्टवर सतत कमेंट करत सुशांतला शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्याने लिहिले- हॅपी बर्थडे स्टार बॉय. एकाने लिहिले- सर्वात प्रतिभावान आणि दयाळू सुपरस्टार वाढदिवसाच्या शुभेच्छा. काही चाहत्यांनी लिहिले की, आम्ही सुशांतला खूप मिस करत आहोत.