#VarunSingh - हेलिकॉप्टर दुर्घटनेत वाचलेल्या वरुण सिंग यांचे निधन

Update: 2021-12-15 08:28 GMT

ब्रिगेडियर बिपीन रावत यांचे तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये गेल्या आठवड्यात निधन झाले होते. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता, तर हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या १४ जणांपैकी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकटे वाचले होचते. पण ते गंभीर जखमी झाले होते. बुधवारी उपचारा दरम्यान वरुण सिंग यांचेही निधन झाले आहे. त्यामुळे या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सर्व १४ जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. वरुण सिंग हे वाचले असल्यामुळे अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळण्याची शक्यता होती, पण आता वरुण सिंग यांच्या निधनाने ही शक्यता मावळली आहे. वरुण सिंग यांच्यावर बंगळुरूच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

एअर फोर्सने ट्विट द्वारे वरुण सिंग यांच्या निधनाची माहिती दिली आहे. वरुण सिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर होती, पण अखेर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. वरुण सिंग यांना नुकतेच शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Tags:    

Similar News