नवरात्रीमधे मांसाहारावर बंदी नको: सोनू निगम

Update: 2022-04-10 14:24 GMT

गायक संगीतकार सोनु निगम (sonu nigam)त्याच्या गाण्यामुळे नेहमी चर्चेचा विषय राहीला आहे.मागे त्याने भोंग्यावरील अजानच्या विषयावरील सुद्धा भाष्य़ केले होते. आता पुन्हा राज ठाकरेंच्या (raj thackeray) गुढीपाडव्याच्या सभेनंतर मुद्दा उपस्थित झाला आहे, सरकारच्या काही धोरणांविरोधात निगम यांनी भाष्य केले आहे.

नवरात्रीच्या वेळेस मटन खाण्यावर बंदी टाकल्याने त्याने सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मी या गोष्टीच्या विरोधात आहे,की नवरात्रीच्या वेळेस मांसाहारवर बंदी टाकली आहे.हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे.मी सुद्धा दुबईत (dubai)राहतो. दुबई इस्लामिक देश आहे. त्यांचे ही खुप कडक कायदे आहेत.तिथे असले काही नियम नाही.की रमजान चालु आहे तर संगीत बंद करा, असे दुबईत सांगत नाहीत.

धर्माला पोट लावु नका,त्यांचा ही धर्म आहे.त्यांना खाऊ द्या असे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.हिजाबवर प्रश्न विचारला असता शाळा आणि कॉलेजमध्ये धर्म आणला नाही पाहिजे.तिथे एक ठरलेला पोशाख असतो.तो परिधान करावा.असे मत यावेळी त्याने मांडले आहे.

सोनू निगम सध्या दुबईत राहत असल्यानं त्यांनी सरकारी धोरणावर टीका केली आहे. परंतू मागील काळात अजानवरुन त्यांनी दोन समाजामधे वादंग निर्माण होईल असंही वक्तव्य केलं होतं. सोनू निगम यांच्या नव्या वक्तव्याची सरकारात्मक आणि नकारात्मक अशी टीका सध्या सोशल मिडीयावरुन सुरु आहे.

Tags:    

Similar News