देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असताना गुजरातमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली असल्याचं चित्र आहे. तसेच मृतांचा आकडा सुद्धा वाढत आहे. त्यामुळे आता समशान भूमीत अंत्यसंस्कारसाठी लागणाऱ्या लाकडांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आता उसाच्या चोथड्याचा वापर अंत्यसंस्कार करण्यासाठी केला जात आहे.
सुरत शहरात यापूर्वी तीन मुख्य स्मशानभूमी होत्या.यात जहांगीरपुरा,रामनाथ आणि अश्विन कुमार स्मशानभूमीचा समावेश होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या एवढी वाढली की, आता नवीन स्मशानभूमी तयार कराव्या लागल्या आहेत.मात्र तरीही या सर्व स्मशानभूमी 24 तास अंत्यसंस्कार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
एकीकडे अशी परिस्थिती असताना आता अंत्यसंस्कारसाठी लागणाऱ्या लाकडांची सुद्धा सुरत शहरात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्याय म्हणून, साखर कारखान्यातून निघणारा उसाचा चोथडा अंत्यसंस्कारसाठी वापरला जात आहे.
यावर बोलताना ,कैलास मोक्ष धाम स्मशानभूमीतील मसन जोगी म्हणाले की,उसाचा चोथा खूप ज्वलनशील पदार्थ असल्याने लवकर पेट घेतो.तसेच त्याचा वापर केल्याने अंत्यसंस्कारसाठी लाकडं सुद्धा कमी लागतात. त्यामुळे आता अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारसाठी उसाच्या चोथंडा वापरला जात.
त्यामुळे गुजरातमध्ये परिस्थिती किती भयंकर आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. अनेक शहरात बेड मिळत नसल्याच्या तक्रार आहेत.