अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

Update: 2024-07-14 06:05 GMT

पुणे - अमेरिकेच्या पेन्सिलमिनिया या शहरांमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. डोनाल्ड ट्रम्प हे प्रचार रॅली दरम्यान भाषण करत असताना गर्दीचा फायदा घेत आठ गोळ्या हल्लेखोरांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झाडण्यात आल्या.

या हल्ल्यात एक गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला लागून गेल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर लगेच सुरक्षारक्षकांनी ट्रम्प यांचा बचाव केला. ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या संबंधित हल्लेखोरांना सुरक्षा रक्षकांनी जागीच ठार केले. मात्र ट्रम्प यांच्यावरील गोळीबारात एक गोळी डोनाल्ड ट्रम्प यांना लागल्याची माहिती समोर येत आहे. ट्रम्प यांच्या जीवितास कोणताही धोका अद्याप तरी झाल्याचे स्पष्ट झाले नाही.

दोन हल्लेखोरांमधील एक हल्लेखोर हा गर्दीमध्ये उपस्थित होता. तर दुसरा हा जवळच असणाऱ्या एका इमारतीच्या छतावर उपस्थित होता. निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन नागरिकांना संबोधित करत होते. याच वेळी ट्रम्प यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या घटनेचा निषेध केला. लोकशाहीमध्ये अशा घटनांना स्थान नाही. डोनाल्ड ट्रम्प हे लवकर बरे व्हावेत. अशा आशयाचे ट्विट ओबामा यांनी केले आहे.

Tags:    

Similar News