राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. राज्यातील विविध विभागाचे सरकारी कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करत आहेत. परंतु अप्रशिक्षित अकुशल कर्मचारी सर्वेचे काम करत असल्याबाबत सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ फिरत आहे. यामधील कर्मचारी स्वतःला इलेक्ट्रिक मदतनीस असल्याचे सांगत असून हे काम करण्याची माझी क्षमता नसतानाही हे काम करायला लावल्याचे सांगत आहेत. पहिली पास असलेल्या या कर्मचाऱ्यांना मोबाईल हाताळता येत नसल्याचे दिसत आहे. सर्वेचे काम अशा अकुशल कर्मचाऱ्यांवर सोपवल्याने या सर्वेतून काढण्यात येणाऱ्या निष्कर्षाच्या अचूकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.