बीड मध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. एकाच Ambulance मध्ये 22 मृतदेह एकावर एक ठेवल्याची घटना ताजी असताना बीडच्या जिल्हा रुग्णालयातून पुन्हा एक एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजता मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह covid वॉर्ड मध्येच तसाच रॅप करून ठेवण्यात आला.
जवळपास वीस तास हा मृतदेह इथेच ठेवला असल्याचा या ठिकाणचे रुग्ण सांगत आहेत. जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेल मधील कॉविड वार्डमधील हा सर्व प्रकार आहे. हा मृतदेह याठिकाणी ठेवण्यात आल्याने वार्डमधील रुग्ण देखील भयभीत झाले होते.
तब्बल वीस तासानंतर हा मृतदेह जिल्हा रुग्णालय प्रशासनाने बाहेर काढलाय. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही, मात्र हा सर्व प्रकार समोर आल्याने आता संताप व्यक्त केला जातोय.