बाबासाहेब पुरंदरे रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक
बाबासाहेब पुरंदरे रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक;
बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी ते पुण्यातील राहत्या घरात पाय घसरून पडले होते. यावेळी पुरंदरे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक उपचार करत आहे. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. 29 जुलै 2021 ला पुरंदरे यांनी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण केले आहे.