नवं 'ब्रिटन रिटर्न' महासंकट कसं रोखणार? सामना
केवळ ब्रिटनची विमानसेवा बंद करुन कोरोनाला रोखता येईल काय? तर… सामनातून केंद्र सरकारला महत्त्वाचा सल्ला केवळ ब्रिटनची विमानसेवा बंद करुन कोरोनाला रोखता येईल नाही तर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला क्वारन्टाईन करुन कोरोनाच्या नव्या स्ट्रेनशी संबंधित सर्व चाचण्या करणे आवश्यक आहे, असा महत्त्वाचा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून सेनेने केंद्राला दिला आहे.;
"भारतासह जगभरातील सुमारे 40 देशांनी ब्रिटनच्या विमान सेवेवर बंदी आणली आहे. मात्र केवळ ब्रिटनच्या प्रवासावर निर्बंध घालून घातक रूप घेऊन आलेल्या नव्या कोरोनाला रोखता येईल काय?, असा सवाल करत आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रत्येक प्रवाशाला क्वारन्टाईन करा आणि त्यांच्या कोरोनासंबंधी चाचण्या करा", असा महत्त्वाचा सल्ला दै. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने केंद्र सरकारला दिला आहे.
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या रूपातील कोरोनाच्या विषाणूमुळे जगभरातील देशांची पुन्हा झोप उडाली आहे. नवे रंगरूप घेऊन आलेला कोरोनाचा हा नवा अवतार पूर्वीच्या विषाणूपेक्षा भयंकर आणि महासंहारक आहे. गंभीर बाब अशी की कोरोनाचा हा नवा स्ट्रेन हिंदुस्थानातही दाखल झाला आहे. ब्रिटनमधून परतलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून हिंदुस्थानात चंचूप्रवेश करणाऱया कोरोनाच्या या नव्या विषाणूने आतापर्यंत 20 जण संक्रमित झाल्याचे सरकारनेच जाहीर केले आहे. वर्षभरापासून छळ मांडणाऱया कोरोनामुळे देशातील जनता आधीच दहशतीखाली असताना नव्या विषाणूची ही बातमी धस्स करणारी आहे. ब्रिटनमध्ये गेल्या आठवडय़ात कोरोनाचा हा नवा अवतार आढळला. हा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक संहारक आहे. या विषाणूचा फैलाव पूर्वीपेक्षाही प्रचंड गतीने होतो आहे. केवळ संक्रमणच नव्हे तर ब्रिटनमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. वास्तविक एप्रिल महिन्यानंतर हळूहळू ब्रिटनमधील रुग्णसंख्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होत गेली होती, मात्र 10 दिवसांपूर्वी प्रथमच एकाच दिवसात 39 हजार रुग्णसंख्या आणि 744 मृत्यू असे विक्रमी आकडे ब्रिटनमध्ये नोंदवले गेले. लागोपाठ दुसऱ्या दिवशीही संक्रमित रुग्ण आणि मृत्यूचा आकडा विक्रमीच राहिला. त्यामुळे ब्रिटनमध्ये तर हाहाकार माजलाच, पण सारे जग हवालदिल झाले आहे.
"केवळ ब्रिटनची विमानसेवा बंद करुन कोरोनाला रोखता येईल काय? ब्रिटनमधून इतर देशांत जाणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या संपर्कातून दुसऱ्या देशांद्वारे भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांतून हे संक्रमण होणार नाही का? इतर शे-दीडशे देशांचा गेले 15 दिवस आणि अजूनही ब्रिटन प्रवास सुरूच आहे. त्यामुळे केवळ ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची चाचणी करूनच भागणार नाही तर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रत्येक देशी-विदेशी नागरिकाला विलगीकरणात पाठवून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनशी संबंधित सर्व चाचण्या करणे आवश्यक आहे", असा महत्त्वाचा सल्ला आजच्या अग्रलेखातून सेनेने केंद्राला दिला आहे.
"ब्रिटनमधील नव्या कोरोनाच्या अवताराची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेत 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमान सेवेवर बंदी घातली होती. मात्र बंदी घालण्यापूर्वीच्या 8-15 दिवस आधी जे तीसेक हजार प्रवासी ब्रिटनमधून हिंदुस्थानात दाखल झाले त्यापैकी काही प्रवाशांद्वारे या घातक विषाणूचे संक्रमण भारतातही झाले. ब्रिटनचा हाहाकार पाहता इकडे भारतात ताकही फुंकून प्यावे", अशी परिस्थिती असल्याचं अग्रलेखात म्हटलंय.
विनोद ब्रिटनमधून अलीकडच्या दिवसांत परतलेल्या प्रत्येक प्रवाशाला शोधून त्यांच्या अत्याधुनिक चाचण्या करण्याचे काम आरोग्य मंत्रालयाने आता हाती घेतले आहे. त्यातून कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या काही रुग्णांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत कोरोनाच्या नव्या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 6 होती. बुधवारी दुपारपर्यंत हा आकडा 20 वर पोहोचला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारने ब्रिटनमधून येणाऱया व जाणाऱया विमानांवर घातलेली बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. ब्रिटनमधून दाखल झालेल्या प्रवाशांतच नव्हे तर त्यांच्या संपर्कात आलेले नागरिकही पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अहवाल समोर येत असल्याने आधीच असह्य ताण झेलणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर हे नवीनच दडपण वाढले आहे.
"वर्षभरापूर्वी पहिल्या कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी उशिरापर्यंत आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुरू ठेवण्याची चूक आपल्याला किती महागात पडली ते आपल्या समोर आहे. ब्रिटनमध्ये फैलावलेल्या नव्या घातक विषाणूचे महासंक्रमण रोखायचे असेल तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच ठोस पावले उचलणे आवश्यक आहे", असं मत अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
अशीच परिस्थिती आता जगावर ओढवली आहे. हिंदुस्थानसारख्या अवाढव्य पसरलेल्या आणि अफाट लोकसंख्येच्या खंडप्राय देशाने तर आता विदेशातून येणाऱया प्रवाशांची डोळय़ांत तेल घालून तपासणी करायला हवी. हिंदुस्थानसह जगभरातील सुमारे 40 देशांनी ब्रिटनच्या विमान सेवेवर बंदी आणली आहे. मात्र केवळ ब्रिटनच्या प्रवासावर निर्बंध घालून घातक रूप घेऊन आलेल्या नव्या कोरोनाला रोखता येईल काय? ब्रिटनमधून इतर देशांत जाणाऱया आणि ब्रिटिशांच्या संपर्कातून दुसऱया देशांद्वारे हिंदुस्थानात दाखल होणाऱया प्रवाशांतून हे संक्रमण होणार नाही काय? इतर शे-दीडशे देशांचा गेले 15 दिवस आणि अजूनही ब्रिटन प्रवास सुरूच आहे. त्यामुळे केवळ ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची चाचणी करूनच भागणार नाही तर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रत्येक देशी-विदेशी नागरिकाला विलगीकरणात पाठवून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनशी संबंधित सर्व चाचण्या करणे आवश्यक आहे. अन्यथा देशाला नव्या संकटाला तोंड द्यावे लागेल. वर्षभरापूर्वी पहिल्या कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी उशिरापर्यंत आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुरू ठेवण्याची चूक आपल्याला किती महागात पडली ते आपल्या समोर आहे.
"ब्रिटनमध्ये फैलावलेल्या नव्या घातक विषाणूचे महासंक्रमण रोखायचे असेल तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. कोरोनाच्या चिनी विषाणूने आधीच वर्षभरात होत्याचे नव्हते केले. त्यात कोरोनाचे हे नवीन 'ब्रिटन रिटर्न' महासंकट आ वासून उभे आहे. कोरोनाच्या या नव्या अवताराला आळा घालावाच लागेल", असं शेवटी अग्रलेखात म्हटलंय.