संजय राऊत कोणता बॉम्ब फोडणार? मंगळवारी पुन्हा पत्रकार परिषद

Update: 2022-03-07 11:08 GMT

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चर्चा राज्यभर झाली होती. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यानंतर आपण सर्व पुरावे पंतप्रधान कार्यालयाला देणार असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे राऊत यांनी पंतप्रधान कार्यालयाला सर्व पुरावे सोपवले आहेत. यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करुन मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. ही पत्रकार परिषदे नेमकी कशासाठी घेणार आहे हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलेले नाही. पण गेल्यावेळची पत्रकार परिषद पाहता संजय राऊत आणखी कुणावर तरी आरोप करु शकतात असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. किरीट सोमय्या यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्य़ाचे पैसे आपल्या मुलाच्या कंपनीत गुंतवले असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.


तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे मोहीम कंबोज यांच्यावरही संजय राऊत यांनी आरोप केले होते. मोहीत कंबोज हे एक दिवस देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील असा दावाही राऊत यांनी केला होता. त्यामुळे आता संजय राऊत या पत्रकार परिषदेत कुणावर आरोप करतात किंवाआणखी कोणत्या वेगळ्या कारणाने ते पत्रकार परिषद घेत आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News