उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या आमदाराची मिरवणूक

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-06-24 09:06 GMT
उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या आमदाराची मिरवणूक
  • whatsapp icon

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे शिवसैनिकांचा संताप झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरुन शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. कोकणातही शिवसैनिक रस्त्यावर उतरले मात्र याचे काऱण होते आपल्या आमदाराच्या स्वागताचे....

कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहिल्याने त्यांचे कुडाळ तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले. कुडाळ शिवसेना शाखेत स्वागत होताच कुडाळ काँग्रेसच्या वतीने देखील त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुडाळ बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. "दीपक केसरकरांसोबत आमचं बोलणे चालू आहे. मला निश्चित खात्री आहे की,दिलीप केसरकर मुंबईत आल्यानंतर शिवसेनेसोबत सामील होतील," अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News