आमदार हरवले आहेत, ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांचे पोस्टर

Update: 2021-06-16 06:57 GMT

ठाण्यातील माजीवाडा परिसरातील शिवसेनेचे नेते, लोकप्रतिनिधी आमदार प्रताप सरनाईक यांचे पोस्टर लागले आहेत. प्रताप सरनाईक हे गेली तीन महिने मतदार संघात नाहीत. आमचे आमदार हरवले आहे अशा आशयाचे पोस्टर प्रताप सरनाईक यांच्या मतदार संघात झळकल्याने ठाणे शहरात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे प्रताप सरनाईक हे सतत विरोधकांच्या रडारवर राहिले आहेत. मध्यंतरी त्यांच्या मुलाची ईडीने चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा हा डाव आहे. असं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं.

त्यानंतर प्रताप सरनाईक माध्यमांपासून बऱ्यापैकी लांब असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर ठाण्यात विविध ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान या पोस्टरच्या खाली कुठल्याही पक्ष अथवा संघटनेचे नाव नसून एक सामान्य नागरिक असे लिहिलेले आहे. त्यामुळे यामागे कोण आहे. हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

Tags:    

Similar News