"माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे" :संजय राऊतांची प्रतिक्रिया

"मी काही सांगत नसून सगळं भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपाचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेलं नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल…तर पाहून घेऊ," अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहीली प्रतिक्रीया दिली आहे.

Update: 2020-12-28 06:00 GMT

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत कोणामध्ये किती जोर आहे पाहूया असं म्हणत अप्रत्यक्षपणे ईडीच्या कारवाईला आव्हान दिलं होतं. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुपारी दोन वाजता राऊत शिवसेना भवनमधून अधिकृत प्रतिक्रीया देणार आहेत.

मला कोणतीही ईडीची नोटीस आलेली नाही,माझा माणूस मी भाजप कार्यालयात पाठवला आहे,बहुतेक तिथे माझी ईडीची नोटीस अडकली असेल,असे उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. "हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात," असंही संजय राऊत यांना यावेळी सांगितलं. "मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे," अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

Tags:    

Similar News