उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण, या भेटीमागे नेमका काय हेतू होता? नेमकी काय चर्चा झाली? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. संजय राऊत यांनी देखील या भेटीनंतर माध्यामांना थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, संजय राऊत यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.ज्यात या भेटीमध्ये राहुल गांधी नेमकी काय म्हणाले याबद्दल ते सांगत आहेत,सोबतच त्यांनी यामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसची स्तुती देखील केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "राहुल गांधींशी माझी चर्चा झाली. राहुल गांधींशी मी यासाठी चर्चा करत असतो कारण ते देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे मुख्य नेते आहेत आणि काँग्रेसशिवाय या देशात विरोधकांचं एक पान देखील हलू शकत नाही. मग कुणी काहीही म्हणो. आजही गावागावात काँग्रेस आहे. मग निवडणुकीत निकाल काही लागो. मात्र एकच पक्ष आहे जो संपूर्ण देशात उभा आहे, एक शिवसेना व दुसरी काँग्रेस."
After meeting @RahulGandhi Shivsena leader @rautsanjay61 speaks…
— Raju Parulekar (@rajuparulekar) October 5, 2021
पहले महाराष्ट्र में अब भारत में#आँधी_आयेगी pic.twitter.com/dqSCpYzBwS
तसेच, ते या व्हिडीओ मध्ये म्हणतात की, "राहुल गांधी यांनी माझ्याशी मोकळेपणाने चर्चा केली. आम्ही दोघेही अशा स्वभावाची लोकं आहोत की, दोघेही मोकळेपणाने बोलतो. आमच्या दोघाचं चांगल्याप्रकारे जमतं देखील. राहुल गांधींनी म्हटलं की, जसं तुम्ही म्हणालात वादळ येणार आणि वादळ येणारचं." असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.