राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी बॅनरबाजी होत असून नवीन कार्यालयांची देखील उद्घाटन होत आहेत. डोंबिवलीमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यालय उद्घाटनाला शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने विरोध करत अडथळा आणल्याचा आरोप 'आप'ने केला आहे. प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी संबंधितांशी केलेली चर्चा..