अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमात्रपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केले आहे. तसंच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळं राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. याच निर्णयामुळे शिवसैनिकांनी अमरावती शहरात प्रचंड जल्लोष करत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका हायकोर्टात दाखल केल्या होत्या.
नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.