शिवजयंती मुद्द्यावरुन शिवसेनेची पलटी

Update: 2022-03-21 07:45 GMT

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सरकार संघर्ष रंगला आहे. तर शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. त्यातच मनसेने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी आपल्या मुळ भुमिकेवरून पलटी मारली आहे.

संजय राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेला टोला लगावला. शिवजयंती तारखेप्रमाणे साजरी करावी का? तिथीप्रमाणे या मुद्द्यावरुन संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मनसेवर टिका केली आहे. कुणी काय करत असेल तर हा आपआपल्या बुद्धीचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या माताीत जन्म घेतला हे महत्त्वाचं. महाराज या मातीत जन्माला आले म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. बाकी इतर प्रांतांना भुगोल आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ज्यांना राजकारण करायचं त्यानी करावं. महाराजांचं व्यक्तिमत्व थोर आणि महान आहे. त्यांनी संपूर्ण देशाला दिशा दिली आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना भाजपमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक वाद रंगला.आमचं हिंदुत्व कातडीचं आहे.आणि शिवसेनेचं सालीचं आहे.अशी टिका भाजपाने केली,या भाजपाच्या टिकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.भाजपवाले कधीपासुन हिंदु झाले हे पहावं लागेल असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या दुश्मनांना एक धडा चारशे वर्षापूर्वी घालून दिला. महाराष्ट्र दुश्मानांपुढे झुकणार नाही, वाकणार नाही. महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी आणि कष्टकऱ्यांसाठी. दुश्मन अंगावर आला तर त्याची बोटं छाटली जातील, असा धडा महाराजांनी दिला. प्रतापगडावर तर अफजलखानाचा कोथळाच निघाला. 25 वर्ष लढून सुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रात मृत्यू पत्करावा लागला हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्र आणि देशाला माहीत आहे. महाराष्ट्राच्या दुश्मनांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेा विशेष करून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आणि प्रेरणेतून शिवसेनेची स्थापना केली. हा भगवा जो फडकतोय आणि आज सगळ्यांना अचानक जे भगव्याचं प्रेम उफाळून आलय. त्याचे प्रमुख जे प्रेरकर होते, ते अगोदर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे कोणाला असं वाटत असेल की दिल्लीचं तख्तं त्याचा वापर करून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना आम्ही झुकवू, गुडघे टेकायला लावू पण त्यांनी एकदा आजचा अग्रलेख तर वाचायलाच हवा आणि त्यांना शिवचरित्र वाचावं लागेल, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.


Full View

Tags:    

Similar News