मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Update: 2021-03-06 05:44 GMT

विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना एका महत्वाच्या गुन्ह्यातील महत्त्वाच्या व्यक्तीचा मृत्यू होतो हे गंभीर आहे, पण विरोधकांनी याचे राजकारण करु नये असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं सापडलेली होती. या गाडीच्या मालकाचा मृतदेह शुक्रवारी ठाण्यातील खाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मृत्यू झालेले मनसुख हिरेन आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी करत गंभीर आरोप केले होते. यावर शिवसेनेतर्फे पहिली प्रतिक्रिया आली आहे.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, जर काही प्रश्न उपस्थित होत असतील तपास व्हायला हवा, विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य असतील , त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. आत्महत्या की हत्त्या ही लोकांच्या मनात शंका आहे आणि या शंकेचे निरसन होणे गरजेचें आहे. पण त्यांच्या मृत्यूचे भांडवल होऊ नये. या घटनेचे सत्य गृहखाते जेवढे लवकर बाहेर आणेल ते सरकारच्या प्रतिमेसाठी चांगले असेल. अधिवेशन सुरू असताना एका महत्वाच्या साक्षीदाराचा मृत्यू होणं धक्कादायक आहे. पण तपास पूर्ण होण्याआधीच विरोधकांनी सरकारला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही आणि हा तपास NIA कडे देण्याची गरज नाही, मुंबईचे पोलीस सक्षम आहेत असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Full View
Tags:    

Similar News