"देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही" ; शिवसेनेचा 'सामना'तून भाजपवर निशाणा

उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. दरम्यान राम मंदिर परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे;

Update: 2021-12-23 03:24 GMT

उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. दरम्यान राम मंदिर परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे या परिसरातील जमीन खरेदी वाढली असून ,अयोध्येमधील जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये स्थानिक आमदार आणि नोकरशहांच्या निकटवर्तीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आलं आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. अशा प्रकारे जमीनी घेणं म्हणजे 'हिंदुत्वाचा चोरबाजार' असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

अयोध्या निकालानंतर राममंदिर परिसरातील जमीन खरेदी भाजपा पुढारी, भाजपाचे आमदार, महापौर, भाजपा गटातील नोकरशाही मंडळींनी वैध-अवैध मार्गाने केल्याचे म्हटले आहे. भाजपा परिवारातील व्यापाऱ्यांनी मंदिर परिसरातील मोक्याच्या जमिनींचे व्यवहार सुरू केलेत. असं शिवसेनेनं म्हटले आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर राममंदिराच्या चार-पाच किलोमीटरच्या परिसरात कोट्यवधींचा जमीन व्यवहार झाल्याचे वृत्त माध्यमातून येत आहे. मंदिर उभारणीनंतर या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल व आज घेतलेल्या जमिनीचे भाव शतपटीने वाढतील असा हा धर्माच्या नावावर चाललेला व्यापार आहे.असे शिवसेनेनं म्हटले आहे. सोबतच राममंदिरासाठी लढले कोण? रक्त सांडले कोणी? मेले कोण व मंदिराच्या नावावर मलिदा खाणारे कोण? हे गौडबंगालच आहे," असा घणाघात 'सामना'च्या अग्रलेखातून केला आहे.

Tags:    

Similar News