भारतातील सर्वोत्तम पोलीस स्टेशन स्पर्धेत शिराळा पोलीस ठाण्याचा देशात सातवा क्रमांक
सांगली // केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने सन -२०१९ -२० मधील कामगिरीच्या आधारावर देशामधील एकुण १० सर्वोत्तम पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली. यामध्ये भारतातील सर्वोत्तम पोलीस स्टेशन स्पर्धेत शिराळा पोलीस ठाण्याचा देशात सातवा क्रमांक आला आहे. महाराष्ट्र राज्यातील एकमेव पोलीस ठाणे आहे.
देशभरातील चांगली गुणवत्ता असणाऱ्या एकुण ७५ पोलीस ठाणेची निवड करणेत आली होती. ही निवड करत असताना पोलीस स्टेशनची इमारत , स्वच्छ आणि सुंदर परीसर , पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या नागरीकांसाठी तसेच पोलीस अमंलदार यांचेसाठी केलेल्या सोयी सुविधा , पोलीस आणि नागरीक संवाद , सामाजिक पोलिसिंग , पोलीस ठाण्यात नागरीकांना मिळणारी वागणुक , पोलीस ठाणेमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्याची वेळेत होणारी निर्गती , गुन्हयामध्ये आरोपींना शिक्षा लागणेचे प्रमाण तसेच पोलीस ठाणेकडील सर्व विभागामध्ये चालणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
यासर्व बाबीत शिराळा पोलीस ठाणेची कामगिरी पुर्ण वर्षभरात सर्वोत्तम राहीलेने राष्ट्रीय स्तरावर पोलीस ठाणेची केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने सन २०१९ -२० मधील कामगिरीच्या आधारावर ०७ व्या क्रमांकावर निवड करणेत आलेली आहे.