शिल्पा शेट्टीला होणार अटक? लखनऊ पोलिस चौकशीसाठी मुंबईत दाखल...

शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. लखनऊ पोलिसांचे तपास अधिकारी चौकशीकरीता मुंबईत दाखल झाले आहेत.

Update: 2021-08-09 16:34 GMT

उत्तर प्रदेशातील वेलनेस सेंटरच्या फसवणुकीच्या कथित प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांची नावे समोर आल्यानंतर शिल्पा शेट्टी अडचणीत सापडली आहे. वेलनेस सेंटरच्या नावाने कथित फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पा आणि तिची आई सुनंदा यांची चौकशी करण्यासाठी लखनऊ पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत.

या आई-मुलीच्या प्रसिध्द जोडीवर लखनऊमधील हजरतगंज आणि विभूती खंड पोलीस ठाण्यात दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. शिल्पा शेट्टी आयोसिस वेलनेस सेंटर नावाची फिटनेस चैन चालवते. या कंपनीची अध्यक्ष स्वतः शिल्पा शेट्टी आहे, तर तिची आई सुनंदा संचालक आहे.

शिल्पा आणि सुनंदा यांनी मिळून दोन लोकांकडून कोट्यवधी रुपये घेतले, असे सांगून दोघींविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदारांनी सांगितले की, अभिनेत्री शिल्पा आणि तिच्या आईने वेलनेस सेंटरची नवीन शाखा उघडण्याचा दावा केला होता, परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. यामुळे ओमाक्से हाइट्सच्या रहिवासी असलेल्या ज्योत्स्ना चौहान यांनी विभूती खंड पोलीस ठाणे तसेच रोहित वीर सिंह यांनी हजरतगंज पोलीस ठाण्यात या माय-लेकीविरूध्द तक्रार केली आहे.

हजरतगंज पोलीस आणि विभूती खंड पोलिसांनी यासंदर्भात दोघींनाही नोटिसा पाठवल्या होत्या. या प्रकरणात लखनऊ पोलिसांचे तपास अधिकारी मुंबईत दाखल झाले असुन अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा यांना या प्रकरणी अटक होण्याची दाट शक्यता आह

Tags:    

Similar News