Pornography : राज कुंद्रानंतर शिल्पा शेट्टी रडारवर, चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Update: 2021-07-24 09:28 GMT

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पोलिसांनी अश्लील फिल्म (Pornography) शूटप्रकरणी अटक केली आहे. राज कुंद्रा या सर्व रॅकेटचा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते आहे. पण आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अभिनेत्री शिल्पा शेट्टीही या प्रकरणात सहभागी होती का, याचाही तपास सुरू केला आहे. शुक्रवारी मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला. त्यांच्या घरातून हार्ड डिस्क आणि कॉम्प्युटर जप्त करण्यात आले आहे. यावेळी शिल्पा शेट्टीची पोलिसांनी चौकशीसुद्धा केली. या चौकशीमध्ये शिल्पा शेट्टीने आपला पती राज कुंद्रा हा निष्पाप असून त्याला यात गोवण्यात आले आहे, असा दावा केला, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसातील सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

रॅकेटचा सूत्रधार वेगळाच असल्याचा दावा

या चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टी हिने मुंबई पोलिसांना महत्त्वाची माहिती दिल्याचेही या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे. या प्रकरणात राज कुंद्रा निष्पाप आहे आणि त्याला गोवण्यात आले आहे, असा दावा शिल्पा शेट्टी हिने केला आहे. अश्लील व्हिडिओंची निर्मिती आणि ते HOTSHOT App वर अपलोड कऱण्यामागे प्रदीप बक्षी असल्याचा दावा तिने केला आहे. प्रदीप बक्षी हा राज कुंद्रा याचा लंडनमध्ये राहणारा नातेवाईक आहे. प्रदीप बक्षी हा या Hotshot एपचे सर्व काम पाहत होता, असा दावाही शिल्पा शेट्टी हिने केला आहे. पण या Hotshot एपवरील कंटेंटबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हती, कारण या एपशी आपले काही देणेघेणे नाही, असेही शिल्पा शेट्टीने मुंबई पोलिसांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

कामुक व्हिडिओ आणि अश्लील व्हिडिओ यामध्ये फरक- शिल्पा शेट्टी

या चौकशीमध्ये शिल्पा शेट्टी हिने मुंबई पोलिसांसमोर HOTSHOT APP बद्दल एक वेगळाच दावाही केल्याची माहिती या वृत्तामध्ये देण्यात आली आहे. यानुसार शिल्पा शेट्टी हिने सांगितले की, HOTSHOT एपवरील कंटेंट हे कामुक आहे, पण अश्लील नाही. तसेच सध्या जे इतर OTT प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावर असेच कामुक कंटेंट जाते पण त्याला अश्लील म्हणून गणले जात नाही.

मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीला HOTSHOT APP बद्दल काही माहिती आहे का, ते कसे वापरतात याबाबतसुद्धा काही प्रश्न विचारले. तसेच HOTSHOT APP वर कंटेंट अपलोडिंगचे काम Viaan Comapnyच्या आवारात व्हायचे याबद्दल काही माहिती तिला होती का याचीही चौकशी करण्यात आली. तसेच या रॅकेटमधून मिळालेला पैसा शिल्पा शेट्टीच्या अकाऊंटमध्ये टाकला गेला किंवा त्यामधून दुसरीकडे पाठवला गेला का याचीही चौकशी आता सुरू झाली आहे.

Tags:    

Similar News