शेगावातील ८६ गावांना मिळणार शुद्ध पाणी...

गजानन महाराजामुळे पावन झालेल्या शेगावातील ८६ गावांना आता पिण्यासाठी गोड आणि शुद्ध पाणी मिळणार आहे. यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर पुढाकार घेतला आहे.

Update: 2023-03-09 14:59 GMT

 खामगाव, शेगाव (Shegaon) तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये आता पिण्याचे गोड आणि शुद्ध पाणी (Pure Water) मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून यासाठी कामे सुरू करण्यात आली असून ८१ कामे प्रगतीपथावर आहेत. तर ७ योजना विविध कारणांनी प्रलंबित आहेत. ५ योजना निविदा प्रक्रियेत असल्याची माहिती खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर (Akash Phundkar) यांनी दिली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी योजनांसाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध केला आहे. राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ही कामे सुरू आहेत. दरडोई ५५ लिटर पाणीचा पुरवठा केला जाणार आहे. दोन्ही तालुक्यातील ८१ गावांमध्ये कामे सुरू आहेत. ती कामे मुदतीत आणि गुणवत्तेच्या निकषावर पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनासह ग्रामस्थांनाही लक्ष द्यावे लागणार आहे.

खामगाव तालुक्यातील हिवरखेड, गणेशपूर, शिराळा येथे पाण्याचे स्त्रोत अयोग्य स्वरुपाचे आहे. तर नायदेवी- पाळा येथे वनविभागाची परवानगी अद्यापही मिळालेली नाही. नांद्री, कंझारा येथे रस्ता परवानगीसाठी रखडली आहे. तर किन्ही महादेव जूनी योजना अंतिम टप्प्यात असल्याने वगळण्यात आली. तर पिंप्री देशमुख, कोटी, पिंप्री गवळी, जळका तेली, गेरु योजनांची निविदा प्रक्रीया सुरु आहे. तर आता ८३ गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारने जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) अंतर्गत योजनांसाठी निधी दिला. दोन्ही तालुक्यातील गावांमध्ये योजनांना मंजूरी आणि निधी मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. ती कामे तातडीने सुरू केली जात असल्याचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर (Akash Phundkar) दिली.

Tags:    

Similar News