शीतल आमटे यांचा मृत्यू गुदमरून?

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शीतल आमटे करजगी यांचा मृत्यू श्वास नलिकेत अन्न अडकल्यामुळे गुदमरुन (चोकींग) झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार म्हणता येईल. मात्र प्राणघातक इंजेक्शन, व्हिसेरा, मोबाईल, लॅपटॉप, टॅब याचा चंद्रपूर व नागपूरातील रासानयिक परिक्षणाचा अहवाल तथा मुंबईच्या न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल येणे बाकी आहे. या दोन्ही प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक अरविंद साळवे यांनी दिली.;

Update: 2020-12-31 03:52 GMT

ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. याआधी सुद्धा शीतल आमटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच त्यांचा मृत्यूबद्दल घातपाताची शक्यता नाकारण्यात आली आहे.

शीतल आमटे आत्महत्या प्रकरणाला तब्बल महिनाभरानंतरही पोलीस तपासात अल्प प्रगती पाहण्यास मिळाली आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी शीतल आमटे यांचा मृत्यू हा श्वास गुदमरून झाल्याचा निष्कर्ष प्राथमिक अहवालात काढण्यात आला आहे. व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. पण, डॉ. शीतल यांचा मृत्यू घातपात नसल्याची माहिती ही त्यांनी दिली.

जून 2020 मध्ये डॉ. शीतल यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी नवी माहितीही पोलिसांनी दिली. घटनास्थळी कुठलीही सुईसाईड नोट नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. टॅब-मोबाईल-लॅपटॉप यांचा प्रयोगशाळा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अल्सर झालेल्या कुत्र्यांना संपविण्यासाठी 3 प्रकारचे इंजेक्शन मागवण्यात आले होते. त्यातील एक रिकामे सॅम्पल मिळाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

विविध अहवाल प्रतिक्षेत असल्यामुळे शीतल आमटे यांच्या मृत्यूबाबत निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचेही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले.

आतापर्यंत या प्रकरणी 16 जणांचा जबाब नोंदवला आहे.ही आत्महत्या आहे की अजून काय याबाबत पोलीस आता तपास करत आहेत. शीतल आमटे यांच्याशी नजीकच्या काळात संभाषण झालेल्या 90 टक्के लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे. अजून पोलीस तपास करत आहेत.

आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. पण नेमके विष कोणते होते याबाबतचा खुलासा पोस्टमोर्टमच्या सविस्तर अहवालात स्पष्ट होणार आहे.

शीतल आमटे यांचा घातपात तर झाला नाही ना, या दृष्टीने पोलीस शक्यता पडताळून पाहत होते. आत्महत्येपूर्वी शीतल आमटे यांनी कुणाशी संवाद साधला, त्यांना कुणाचे फोन आले, त्यांना कोण-कोण भेटले अशी माहिती पोलीस गोळा करत आहे. शीतल आमटे या मानसिक तणावाखाली होत्या, त्यामागचे कारण काय होते, याचा तपासही पोलीस करत आहे.


शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने ताब्यात घेत मुंबईतील IT तज्ज्ञांकडे पाठविला आहे. डॉ. शीतल यांनी या गॅजेटचे पासवर्ड नुकतेच बदलले होते व याची माहिती कोणालाही नव्हती. यामुळे तपास खुंटला आहे. त्यांच्या पतीला देखील याबाबत माहीत नव्हती.

यापैकी काही गॅजेटमध्ये डॉ. शीतल यांनी स्वतःचे डोळे पासवर्ड ठेवला असल्याने प्रक्रिया अवघड झाली आहे. डॉ. शीतल यांचे नोकर आणि घरगुती मदतनीस यांची चौकशी करण्यात आली आहे. आता पोलीस अजून तपास करत असून अनेकांची चौकशी सुरू आहे.

मध्यंतरीच्या काळात शीतल आमटे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल आणि संस्थेतील विश्वस्तांबद्दल नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. पण, दोन तासांनंतर त्यांचा फेसबुकवरील हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला होता. त्यांच्या या व्हिडीओमुळे आमटे कुंटुंबातील वादावर चर्चा रंगली होती. परंतु, आमटे कुटुंबाकडून एक पत्रक प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते.

Tags:    

Similar News