राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत शिवसेने एकटे पाडण्याचा पवरांचा डाव होता असा खळबळजनक दावा केला आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, २०१७ मध्ये शिवसेनेला एकटे पाडण्यासाठी दिल्लीत कुणाच्या घरी आणि कधी बैठक झाली होती, याचा सर्व तपशील माझ्याकडे पुराव्यासह उपलब्ध आहे, असं मुंडे म्हणाले.
दरम्यान, रयत आणि कुटूंब यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा जाणता राजाने कुटुंब का निवडले ? खरंतर जाणता राजाला घर नसते, पोरं बाळं नसतात, संबंध राज्य त्याचे कुटुंब असते, रयत त्याचे कुटुंब असते. मग या राजाने असा निर्णय का घेतला? असा सवालही यावेळी धनंयज मुंडे यांनी निर्माम केला.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, शरद पवारांनी सन १९७८ मध्ये राज्यात पुरोगामी लोकशाही दल अर्थात 'पुलोद' नावाचे सरकार स्थापन केलं होतं, त्याला संस्कार म्हणायचे आणि आता अजित पवारांनी वेगळं होऊन जे केलं त्याला गद्दारी म्हटलं जातं. अजित पवारांनी जे केलं, ते त्यांनी एकट्यांनी नाही केलं, तर आमच्यासारख्या असंख्य जणांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतल्याचं यावेळी मुंडेंनी सांगितलं. ते बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर येथे राष्ट्रवादी युवक मेळाव्यात बोलत होते.
२०१७ साली झालेल्या बैठकीचे तपशील व्हिडिओ मी दाखवू शकतो
धनंजय मुंडे म्हणाले की, २०१७ साली गणेश चतुर्थीच्या दिवशी कुठे बैठक झाली? कधी बैठक झाली? शिवसेनेला कसं बाजूला काढायचं? यावर चर्चा झाली या बैठकीत जे काही झाले त्याला संस्कार म्हणायचे आणि आम्ही जे केले त्याला गद्दारी म्हणायची? त्यावेळी झालेल्या बैठकीचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. ही बैठक दिल्लीत कुणाच्या घरी झाली, याचा पूर्ण तपशील मी सांगू शकतो, असा इशारा यावेळी धनंजय मुंडे यांनी दिला आहे.