जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, शरद पवार म्हणाले, त्यात काय झालं?
जयंत पाटील यांनी एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
काय म्हटलंय शरद पवार यांनी... "त्यात काय झालं? त्यांना शुभेच्छा. उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावेसे, कोणी तसे करणार का?" असा उलटा सवाल पत्रकारांना केला आणि एकच हशा पिकला...
काय म्हटलं होतं जयंत पाटील यांनी... "आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल. एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो," अशी इच्छा बोलून दाखवली होती..