आज शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. महाविकास आघाडी सरकार सध्या सचिन वाझे प्रकरणाने चांगलेच अडचणीत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
गेल्या काही दिवसात संजय राठोड आणि सचिन वाझे प्रकरणांनी महाविकास आघाडी सरकारच्या इमेजला चांगलाच तडा गेला आहे. हे सर्व होत असताना महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार याबाबत अद्यापपर्यंत एक शब्दही बोलले नाहीत. त्यातच सचिन वाझे आणि संजय राठोड हे दोनही प्रकरण शिवसेनेशी निगडीत असल्यानं गृहखातं असलेल्या राष्ट्रवादीला काहीही करता आलं नाही. त्यामुळं या सर्व प्रकरणामध्ये राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याची चांगलीच नाचक्की झाली.
एवढं सर्व होऊनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एकही भेट झाली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार शिवसेनेवर नाराज होते. संजय राठोड प्रकरण उद्धव ठाकरे यांनी योग्य पद्धतीने हॅंडल केलं नाही. असं पवाराचं मत होतं. आणि त्यानंतर सचिन वाझे प्रकरण शिवसेनेने ज्या पद्धतीने हॅडल केलं. त्यामुळे सरकार चांगलंच अडचणीत सापडलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे.
काही घडलं भेटीत?
या भेटीत सचीन वाझे प्रकरणात सरकारचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी रणनीति ठरल्याचं बोललं जात आहे. मंत्रीमडळात फेरबदल करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, सध्या सरकारचं डॅमेज कंन्ट्रोल करण्याचं काम पवारांनी हातात घेतल्याचं बोललं जात आहे.