शरद पवार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
, डिस्चार्जनंतर जनतेला केलं 'हे' आवाहन

शरद पवार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
, डिस्चार्जनंतर कार्यकर्त्यांना केलं 'हे' आवाहन

Update: 2021-04-03 09:05 GMT

शरद पवार यांची आज डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात वेदना जाणवल्यानं त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या संदर्भात आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.


शरद पवार यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि १५ दिवसानंतर जर त्यांच्या शरीराने चांगली साथ दिली तर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना विनंती आहे की, त्यांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्याने त्यांच्या भेटीस जाण्याचे टाळावं. असं आवाहन नवाब मलिक यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.


Tags:    

Similar News