महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेत 12 सदस्यांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मात्र, राज्यपालांनी या सदस्यांची नेमणूक केलेली नाही. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाहीने घटनेने दिलेली जबाबदारी न पाळणारे राज्यपाल कधी महाराष्ट्राने पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केलेला आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्यपालांची जबाबदारी असते घटनेनं राज्य सरकार आणि मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत. त्यानुसार शिफारस झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे हे राज्यपालांचं काम असतं. केंद्र सरकार याबाबत बघ्याची भूमिका घेत आहे. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.