पवार काका-पुतणे पुन्हा एकत्र ?

Update: 2024-01-03 09:32 GMT

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी एकाच मंचावर येणार आहेत. शंभराव्या मराठी नाट्यसंमेलनावेळी प्रतिस्पर्धी काका-पुतणे एकाच वेळी एकाच मंचावर येणार असल्याने पुन्हा काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या राजकीय चर्चाना रंगत आली आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहारामध्ये शरद पवार व अजित पवार या दोन्ही नेत्यांना मानणारे कार्यकर्ते आणि नेते मोठया प्रमाणत आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटल्या नंतर हे दोन्हीही नेते एकाच व्यासपीठावर येत आहेत. यामुळे पुढील काही दिवसांत होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते काय बोलणार? याकडे सर्व कार्यकर्ते आणि नेते यांचे लक्ष लागले आहेत.

शरद पवार यांच्यापासून वेगळे होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाले त्यामुळे राज्यातील राजकारणाला वेगले वळण लागले आहे. अजित पवार ह्यांनी भाजप बरोबर सत्तेत सामील होण्याची वेगळी भूमिका घेतली. शरद पवार यांनी भाजप सोबत न जाता विरोधातच राहण्याचं पसंत केलं. यामुळे मागील काही दिवसांमध्ये शरद पवार आणि आजित पवार यांच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोपांनी जोर धरला होता. यामध्ये अनेक वेळा दोघांनी एकमेकांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या टीका देखील केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता काका पुतणे एकाच मंचावरून भाषण करणार असल्याने यावेळी नेमक काय बोलणार? दोघेही एकमेकांवर टीका टिपण्णी करतील का? हे बघणं महत्वाचं ठारणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे या संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. जवळ पास 24- 25 वर्षानंतर पिंपरी चिंचवड शहरात हे नाट्यसंमेलन होत आहे. पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात काका आणि पुतणे उपस्थित राहणार आहेत, हा शहरासह राज्यभरात चर्चेचा विषय आहे.

Tags:    

Similar News