डॉक्टरची कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी
औरंगाबादमध्ये महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात डॉक्टरनं कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकरणावरुन आज विधानसभेत पडसाद पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्याची घोषणा कोविड सेंटर मध्ये महिला सुरक्षेसाठी एसओपी निश्चित करण्यात येईल असे सांगितले.;
औरंगाबादमध्ये महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात डॉक्टरनं कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोपकेल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई सुद्धा करण्यात आली आहे.
पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली. तिच्यावर उपचार सुरू असतानाच एक आयुष डॉक्टरने मंगळवारी रात्री दोन वाजता या महिलेकडून शरीर सुखाची मागणी केली. एवढंच नाही तर तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध करत आरडाओरड केली. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. पीडित महिलेची सुटका केली.
या प्रकारानंतर रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टरला बेदम मारहाण केली. तर महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या त्या डॉक्टरची हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती महानगरापालिका आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी दिली आहे.