Serum Institute Fire: सिरम इन्स्टिट्यूटला आग अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया...
देशाला कोरोनाची लस (कोव्हिशिल्ड) देणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील नवीन बिल्डिंगला आहे लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांनी या इन्स्टिट्यूटला आग लागल्याचा आरोप केला आहे.
या आरोपानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात झाल्या आहेत. पुणे आयुक्तांकडून मी या संदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.
सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे याला प्राधान्य देण्यात आल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.