आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते व्हि. के. जाधव यांचे निधन

Update: 2024-07-27 11:00 GMT

रिपब्लिकन चळवळीतील स्वाभिमानी नेते, ज्येष्ठ समाजसेवक, बहूजनांचे आधारवड असलेले नागोठणे येथील ज्येष्ठ नेते वसंत कृष्णा उर्फ व्हि. के. जाधव यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन आणि धम्म चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी नंदा जाधव, मुलगा संजय जाधव, मुलगी मंगल व मनीषा तर सुन संध्या जाधव तसेच नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे




 


निस्वार्थी आणी स्वाभिमानी बाण्याने त्यांनी आपले जीवन समाज , राष्ट्र आणी देशहितासाठी समर्पित केले. बहुजन महापुरुष, महानायिका यांचे लढावू, क्रांतिकारी, परिवर्तन वादी विचार घराघरात तळा गळात पोहचविण्याचे काम त्यांनी हयातभर केले.

आंबेडकरी चळवळीतील पक्ष, धार्मिक संघटना, निळ्या झेंड्याशी ते सतत प्रामाणिक राहिले. हजारो तरुणांना आंबेडकरी चळवळीशी जोडून अन्याय अत्याचारा विरोधात लढण्याची त्यांनी प्रेरणा दिली.




 


अजातशत्रू म्हणून ओळख असलेले प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे व्हि. के. जाधव यांनी आंबेडकरी बहुजन चळवळीला ताकत देण्याचे काम केले. ते एक उत्तम संघटक होते, ते अनेकांचे मदतगार आणि आधारवड होते. आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी अनेक जिवाभावाची माणसे जोडली. रिपब्लिकन ऐक्यात त्यांनी मुख्य भुमिका बजावत आंबेडकरी नेत्यांना एकत्र आणण्यात त्याकाळी त्यावेळी ते यशस्वी ठरले होते, यातच त्यांच्या कर्तृत्वाची उंची सामावली आहे. महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळ, धम्म चळवळ वाढीसाठी त्यांनी तन मन धनाने योगदान दिले आहे, पुरोगामी आणी परिवर्तवादी चळवळ मजबूत व बलाढ्य होण्यात त्यांच मोठं योगदान राहिले आहे. अडीअडचणीत संकटात सापडलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदतीचा हात दिलाय. सामाजिक सलोखा ऐक्य बंधूत्व राखण्यात ते नेहमीच पुढाकार घेत. लोकशाही आणी संविधानाच्या रक्षणासाठी व्हि. के. जाधव नेहमीच आग्रही आणी कृतीशील राहिले. आदिवासी, कष्टकरी, श्रमिक, गरीब गरजू बहूजणांची मुले शिकली पाहिजेत यासाठी त्यांनी सर्वोतोपरी योगदान दिले. सेवाभावी वृत्तीने ते हजारोच्या मदतीला धावून जातं असत. सर्वांच्या सुखदुःखात त्यांची हजेरी असायची. त्यांनी नेहमीच साधेपणा जपला, त्यांचा करारी बाणा पाहण्यासारखा होता. व्हि. के. जाधव यांच्या रूपाने आंबेडकरी चळवळीतील कोहिनुर हिरा हरपला आहे. राजकीय, सामाजिक चळवळीकरिता त्याग, समर्पण आणी दानशूर पणा जपणारे नेतृत्व काळाच्या पडद्या आड गेल्याने चळवळ पोरगी झाल्याची भावना अंत्य यात्रेस उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. दिवंगत व्हि. के. जाधव यांचा पुण्यानुमोदन आणि शोकसभा रविवार दिनांक 04 ऑगस्ट 2024 रोजी वांगणी शांतिदूत फार्म हाऊस येथे पार पडणार आहे.



 


Tags:    

Similar News