जेष्ठ स्त्रीवादी लेखिका विद्यूत भागवत यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी दलित महिला शेतकरी चळवळीत योगदान दिले. भाषाशास्त्र समाजशास्त्र, साहित्य शिक्षण आणि स्त्रियांविषयी अभ्यासपूर्ण लेखन आणि संशोधन केले होते. womens writing in india या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी देशातील विविध भाषेत लेखन करणाऱ्या लेखिकांचे लेख एकत्रित प्रकाशित केले. विद्युत भागवत यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून विपुल लेखन केले. मानववंशशास्त्रातील लिंगभावाची शोधमोहीम, वाढत्या मुलतत्ववादाला शह सुसंवादी लोकशाही दिशेने लेखमाला, फेमिनिस्ट सोशल थॉट्स ही त्यांची गाजलेली पुस्तके होती. त्यांच्या स्त्री प्रश्नाची वाटचाल या पुस्तकाला समाजविज्ञानकोश हा पुरस्कार मिळाला तर २००६ मध्ये त्यांना सरस्वत गौरव पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आले होते. विद्युत भागवत यांच्या जाण्याने साहित्य,चळवळ आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.