सरकारने प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला दरमहा दहा हजार रुपये सन्मान वेतन म्हणून द्यावेत ही मागणी केवळ वेतनापूर्ती मर्यादित नसून तो वयोवृद्धांच्या सन्मानाचा मुद्दा आहे अशी एकमुखी भावना विविध पक्ष संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.जनता दल ( सेक्युलर ) पक्षाच्या वतीने वयोवृद्ध जनता सन्मान वेतन मोहिमेअंतर्गत घाटकोपर इथं १३ नोव्हेम्बर रोजी आयोजित करण्यात आलेल्या तरुण - वयोवृद्धांच्या बैठकीत बोलताना बहुसंख्य कार्यकर्त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे.या मोहिमेअंतर्गत मुंबईच्या वस्त्या वस्त्यांमध्ये बैठकांचे आयोजन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
वयोवृद्ध जनता सन्मान वेतन मोहिमेचे मुख्य संयोजक आणि जनता दल ( सेक्युलर ) चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवि भिलाणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला पक्षाच्या मुंबई महासचिव ज्योतिताई बडेकर,मुंबई सचिव संदेश गायकवाड,ईशान्य मुंबई अध्यक्ष संजीवकुमार सदानंदन उपस्थित होते.त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांचे बाळासाहेब उमप,सुनील साळवे,विजय त्रिभुवन,रामू पवार,सुनंदा नेवसे,ललिता मोहिते,अनुराधा गंगावणे,शिरीष रामटेके,कामगार नेते सीताराम लवांडे,जेष्ठ पत्रकार संजय शिंदे,उदय कासारे,आनंद शिंदेकर,किशोर कर्डक,रवी भोसले,अश्विन कांबळे,सुरेंद्र पटेल,प्रकाश होवाळ,आनंद म्हस्के,ओमप्रकाश पासी, जीवन भालेराव,प्रकाश महिपती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
येत्या काही दिवसात या मोहिमेची सदस्यता नोंदणी करण्याबरोबरच मुंबईतील प्रत्येक वस्तीत जाहीर बैठका घेऊन ही मोहीम मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा निर्धार सर्वच कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.