अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर भारतात देखील वातावरण गरम होताना दिसत आहे. तालिबान च्या विरोधात जगभरात संताप व्यक्त केला जात असताना उत्तर प्रदेश च्या संभल लोकसभा मतदार संघाचे खासदार शफीकुर रहमान बर्क़ यांनी तालिबान च्या विजयाची तुलना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी केली आहे. बर्क़ यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभल चे पोलिस अधिक्षक चरकेश मिश्रा यांनी राजेश सिंघल यांच्या तक्रारी नंतर हा गुन्हा दाखल केला आहे. तालिबान या संघटनेला भारत सरकार ने देशद्रोही संघटन म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळं अशा संघटनेशी भारतीय लढ्याशी तुलना करणं देशद्रोह्याच्या श्रेणीत येतं. असं सिंघल यांनी म्हटलं आहे.
सिंघल यांनी शफीकुर रहमान बर्क़ यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन लोकांनी या संदर्भात फोसबूकवर लिहिण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे. त्या लोकांच्या विरोधात देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बर्क ने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं...
"आपला देश जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात होता. तेव्हा पूर्ण भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता. अफगाणिस्तानमध्ये देखील अमेरिकेने कब्जा केला होता. तेव्हा ते देखील देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून देऊ इच्छित होते. तालिबान तिथं एक शक्ती आहे. आणि त्यांनी अमेरिकेला तिथं राहू दिलं नाही.'' मात्र, या सर्व प्रकरणावर आता त्यांनी प्रतिक्रिया देताना
मी तालिबानचा रहिवासी नाही. माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देणार मी कोण? माझं वक्तव्य तोडून मोडून मांडलं आहे. मी असं काही म्हटलं नाही रिमार्क्स अशी प्रतिक्रिया यांनी दिली आहे.