घरबांधकामासाठी पत्नीकडे पैसे मागणे, गुन्हा ठरणार, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Update: 2022-01-12 09:02 GMT

घराच्या बांधकामासाठी पत्नीकडे पैशाची मागणी करणे हा देखील हुंडा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. त्यामुळे आता घर बांधकामांसाठी पत्नी कडे पैसे मागणे आता गुन्हा मानला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हा निकाल दिला आहे..

काय आहे प्रकरण?

एका प्रकरणात ट्रायल कोर्टाने कलम ३०४-बी (हुंडा हत्या), आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंड्यासाठी छळ करणे या कलमांखाली महिलेचा पती आणि सासऱ्यांना दोषी ठरवले होते. या प्रकरणात आरोपींनी महिलेकडे पैशाची मागणी करत तिचा छळ केला होता. आणि यातच त्या महिलेचा मृत्यू झाला होता.  महिलेचा पती आणि सासरा सदर मृत महिलेकडे घर बांधण्यासाठी पैशाची मागणी करत होते. तिच्या कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने ते पैसे देऊ शकत नव्हते.

हुंडा शब्दांचे विस्तृत वर्णन…

मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमणा, न्यायमूर्ती ए एस बोपण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने 'हुंडा' या शब्दाचे विस्तृत अर्थाने वर्णन केले पाहिजे, जेणेकरून एखाद्या महिलेची कोणतीही मागणी, मग ती मालमत्तेशी संबंधित असो किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूचा समावेश करता येईल. असं मत मांडले.

Tags:    

Similar News