अंबानी कुटुंबाला २१ वर्षापुर्वीचं प्रकरण भोवलं, कोट्यावधी रुपयांचा दंड

Update: 2021-04-08 05:13 GMT

एकीकडे मुकेश अंबानी यांनी जॅकमाला मागे टाकत आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाल्याच्या बातम्या येत असताना अंबानी कुटुंबाला २१ वर्षापुर्वीचं प्रकरण भोवलं आहे. सेबी ने अंबानी बंधुंना (मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नींना) 21 वर्षापुर्वीच्या एका प्रकरणात २५ कोटींचा दंड ठोठावला आहे.

सेबी ने आपल्या निकालात रिलायंस इंडस्ट्रीज च्या प्रमोटरर्सनी 2000 मध्ये केलेल्या शेअर खरेदी बाबत हा निर्णय दिला आहे. सेबीच्या नियमानुसार ५ टक्क्यापेक्षा अधिक शेअर खरेदी केल्यास हे सेबीला कळवणं गरजेचं होतं. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रमोटर्सने ही माहिती न कळवता 6.83 टक्के शेअर खरेदी केले होते. त्यामुळे सेबीने आपल्या ८५ पानांच्या निर्णयामध्ये रिलायंस इंडस्ट्रीजचे प्रमोटरों असलेले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यासह त्यांच्या पत्नी नीता आणि टीना अंबानी यांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Tags:    

Similar News