Dr. Rani Bang : जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉ. राणी बंग यांची प्रकृती बिघडली

Update: 2022-11-17 09:45 GMT

सामाजिक कार्यकर्त्या आणि सर्च संस्थेच्या संस्थापिका डॉ. राणी बंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूर येथून मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

सर्च संस्थेच्या संस्थापक डॉ. राणी बंग यांच्यावर नागपूर येथील सिम्स (CIIMS Hospital) रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन दिवसापूर्वी वर्धा (wardha) येथील मगन संग्रहालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमातील भाषण संपल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर तात्काळ त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात नेण्यात आले. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना तेथून नागपूर येथील सिम्स रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला असल्याने पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी शिफ्ट करण्यात येणार आहे.

डॉ. राणी बंग यांनी स्त्रियांच्या आरोग्यावर महत्वपूर्ण काम केले आहे. याविषयी त्यांची 'कानोसा' आणि 'गोईन' अशी दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. गडचिरोली येथील आदिवासी समुदायासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाबाबत त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या आरोग्याबाबत आलेल्या या बातमीने समाजातील विविध स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

Tags:    

Similar News